राष्ट्रवादीत महिलांना सन्मानपूर्वक कार्य करण्याची संधी- चित्रा वाघ

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

‘खरे पाहता,राजकीय क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्‍तेदारी आहे. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुरदृष्टीमुळेच महाराष्ट्रात महिलांविषयक धोरणांची अंमलबजावणी झाली.राष्ट्रवादीमध्ये देखील महिलांना योग्य आणि सन्मानपूर्वक कार्य करण्याची संधी मिळते. खासदार वंदना चव्हाण यांची काम करण्याची पध्दत, अभ्यासूवृत्ती, राज्‍यसभेत उपस्थित केलेले प्रश्न यामुळेच त्‍यांची दुस-यांदा राज्‍यसभेवर खासदार म्‍हणून निवड केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

पुण्यातून राज्‍यसभेच्या खासदारपदी वंदना चव्हाण यांची दुस-यांदा बिनविरोध निवड झाली. त्‍यानिमित्‍तपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर जिल्‍हा महिला आघाडीच्या वतीने चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्या हस्ते चिंचवड येथे जाहीर सत्‍कार करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर अनिता फरांदे व ज्‍येष्ठ नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा धर, संगिता ताम्‍हाणे, माजी नगरसेविका शकुंतला भाट, माजी उपमहापौर रेखा गावडे, विश्रांती पाडळे, शहर संघटिका कविता खराडे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, फजल शेख, तसेच लता ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, युवती आघाडीच्‍या वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

वाघ म्‍हणाल्या की, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला आघाडीने खासदार वंदना चव्हाण यांचा गौरव करून स्त्रि-शक्‍तीचा सन्मान केला आहे. राज्‍यातील राष्ट्रवादीच्या अन्य शाखांनी याचे अनुकरण करण्याची गरज आहे. यापुढील काळात लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्‍यासाठी महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नवनियुक्‍त प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार प्रत्‍येक प्रभाग, बुथ स्‍तरावर संघटन उभे करण्यावर भर दिला जाईल, असे वाघ यांनी सांगितले.

खासदार चव्हाण म्‍हणाल्‍या की, महिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाली की घरातुनसुध्दा हळुहळु मदत मिळू लागते. त्‍यासाठी महिलांमध्ये आत्‍मविश्वास निमार्ण करणे आवश्यक आहे. देशात सर्वप्रथम महिलाविषयक धोरण महाराष्ट्र राज्‍यामध्ये अंमलात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुरदृष्टीमुळेच राज्‍यात सरकारी खात्‍यामध्ये तसेच राजकारणातही महिलांसाठी 30 टक्‍के जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्‍याचा सकारात्‍मक परिणाम आता पहायला मिळत असून अनेक महिला शासकीय सेवेत किंवा राजकीय क्षेत्रात उच्चपदावर पहायला मिळतात. कुटुंबियांचा तसेच पवार साहेबांची दुरदृष्टी आणि पाठिंब्‍यामुळे मला राजकारणात येण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीमध्ये माणसाची अभ्यासूवृत्ती, जनमानसात असलेली प्रतिमा, क्षमता पाहून जबाबदा-या दिल्‍या जातात. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना महिलांनी महिलांविषयी आदर राखण्याची गरज आहे, असे खासदार चव्हाण म्‍हणाल्या.

खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणा-या ‘स्‍माईल’ प्रकल्‍पाप्रमाणे पिंपरी चिंचवडमधील महिलादेखील झोपडपट्‍टीतील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आगामी काळात सुनेत्राताई पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करणार आहेत,असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.