रुग्णालयात नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची

पिपरी : पोलीसनामा ऑनलाईन

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. हा प्रकार पिंपरी येथील डिवाय पाटील रुग्णालयात आज (शुक्रवार) पावणे नऊच्या सुमारास घडला.

पिंपरी चिंचवड येथील एका २७ वर्षीय तरुणावर डिवाय पाटील रुग्णालयात उपचार सरु होते. आज सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचे सांगत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नातेवाईकांना समजवण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना नातेवाईकांनी धारेवर धरले. नातेवाईक आणि डॉक्टर यांच्या बाचाबाची सुरु झाल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले होते.

या घटनेची माहिती पिंपरी पोलिसांना समजताच पोलिसांचे एक पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले असून परिस्थीती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.