‘या’ 4 चुका केल्या तर कधीही वाढणार नाही रोगप्रतिकारकशक्ती, वेळीच सावध व्हा

कोरोनाचा धोका आणि पावसाळ्यात पसरणारे आजार या दोन्हीपासून बचाव करायचा असेल तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खुप आवश्यक आहे. जीवनशैलीत बदल आणि योग्य आहार, आयुर्वेदिक उपाय इत्यादीने रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. मात्र काही चुका जर तुमच्याकडून सतत होत असतील तर रोगप्रतिकारकशक्त वाढत नाही. या चुका कोणत्या ते जाणून घेवूयात…

या आहेत त्या चुका

1 आहार आणि वेळा
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे, जेवणाच्या आणि नाष्त्याच्या वेळा न पाळणे, कधीही मुड होईल तेव्हा जेवणे, यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

2 आळस
आळस अंगात भरलेला असल्यास व्यायामकडे दुर्लक्ष होते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

3 वेळे झोप
पुरेशी झोप न घेतल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. कमी व अशांत झोपेमुळे शरीरातील एंटिजन्स योग्यप्रकारे काम करत नाहीत.

4 डी व्हिटॅमीन्स
शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता निर्माण झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात थांबा.