रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी आणि मुलगा राहूल यांना अटक

नवी दिल्लीः पोलिसनामा आॅनलाईन

वेगवेगळ्या 7 बॅकांतून 3700 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपात रोटोमॅक पेन कंपनीचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहूल कोठारी यांना सीबीआयने अटक केली आहे. हे दोघेही रोटोमॅक ग्लोबल प्रायवेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी कानपूरमध्ये आहे असून काही दिवसांपुर्वी सीबीआयद्वारे दोघांनाही दिल्लीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांच्यावर 7 बॅकांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

सीबीआयने बॅक आॅफ बडोदाच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी सायंकाळी चौकशीसाठी या दोघांना सोबत घेऊन सीबीआय ही कानपुरात गेली होती. लागोपाठ दोन दिवस सीबीआयने कानपुरात यांच्या घरांवर धाडी टाकल्या. कोठारी विरूध्द 3700 कोटी रुपये इतक्या कर्जाची फसवणूक केल्याच्या प्रकरणाची कसून तपासणी केली जात आहे.

या प्रकरणाविषयी तपास एजंन्सी पुरावे जमाकरण्यासाठी योग्य ते प्रयत्न करत आहे. त्यासाठी कानपूरबरोबरच उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या. ज्या कारणासाठी हे कर्ज घेतले. त्या कारणासाठी ते वापरले गेले नसल्याचे प्राथमिक सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. कोठारी याची पत्नी साधना आणि मुलगा राहूल देश सोडून पळू शकले नाही. सीबीआयद्वारे पुढील तपास सुरू आहे.