लग्नात गेलेल्या पाहुण्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरांचा डल्ला

देहूरोड : पोलिसनामा ऑनलाईन

नातेवाईकांच लग्न एका कुटुंबाला चांगलच महागात पडलं आहे. लग्नास गेल्यानंतर मंगल कार्यालयाच्या समोर पार्क केलेल्या चारचाकी गाडी मधून रोख रक्कम आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत.याप्रकरणी देहूरोड पोलिसात ममता योगेश गुप्ता यांनी फिर्याद दिली असून अज्ञात विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुप्ता कुटुंब हे नातेवाईकाच्या लग्नाला मुलासह चारचाकी गाडीत रावेत येथील मंगल कार्यालयात आले होते.त्याचदरम्यान ममता योगेश गुप्ता यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख रक्कम चारचाकी गाडीतच ठेवली,कुटुंब मंगल कार्यल्याच्या समोर गाडी पार्क करून लग्नास गेले.तेव्हा चोरट्याने डाव साधत गाडीची काच फोडली आणि रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला,लग्न झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी थेट देहूरोड पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.याप्रकरणी अज्ञाता विरोधात देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.