लग्नासाठी निघालेल्या मोटारीला भीषण अपघात; एक जण ठार

पैठणः पोलीसनामा आॅनलाईन
लग्नासाठी निघालेल्या नवरदेवाच्या इनोव्हा मोटारीला रस्ते वाहतूक करणाऱ्या जीपने दिलेल्या भीषण धडकेत एक जण ठार झाला असून नवरदेव व वऱ्हाडी जखमी झाले आहेत. पैठण तालुक्यातील ढोरकीनजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर लग्नाला उशीर झाला. इनोव्हा मोटारीमध्ये असलेला नवरदेव संजय राटवाल किरकोळ जखमी झाला होता. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले तर काळी-पिवळीमधील प्रवाशी अमोल बोबडेचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते ईसारवाडीचे रहिवासी होते.