लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक अवनी चतुर्वेदी

भारतीय वायूदलातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग २१ हे लढाऊ विमान उडवत भारतीय संरक्षण दलात एक नवा इतिहास रचला आहे. १९ गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावरुन फेब्रुलारीमध्ये अवनी यांनी ‘फाइटर एअरक्राफ्ट मिग २१ बिसन’च्या साथीने आकाशात झेप घेतली. जवळपास ३० मिनिटांच्या या उड्डाणानंतर अवनी यांच्या फायटर एअरक्राफ्टने पुन्हा जमिनीवर यशस्वी आणले.

साचेबद्ध करिअरच्या वाटेवर न जाता वेगळ्या दिशेला गेलेल्या अवनी यांचा संपूर्ण देशाला गौरव वाटत आहे.” फ्लाइंग ऑफिसर चतुर्वेदी यांनी मिग २१च्या केलेल्या यशस्वी उड्ड्णाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. भारतीय हवाई दलात महिला अधिकाऱ्यांना पुरुषांइतकेच प्राधान्य दिले जाते’, असे म्हणत देशासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असल्याचे,” एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआंनी ‘टाइम्स’शी संवाद साधताना सांगितले.

”कोणत्याही देशाचे हवाई दल हे त्यात असणाऱ्या लढवय्यांमुळे ओळखले जाते. त्यामुळे एक लढाऊ वैमानिक होण्याचे माझे स्वप्न आहे. मला एक अशी वैमानिक व्हायचे आहे जिच्यावर थेट कारवाई करण्याच्या वेळेप्रसंगी तिचे वरिष्ठ निर्विवादपणे विश्वास ठेवू शकतात. शिवाय, मला सर्वोत्तम लढाऊ विमान उडवायचे असून प्रत्येक दिवशी त्याविषयीच्या गोष्टी नव्याने शिकायच्या आहेत”, असे अवनी यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.