वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून नाकाबंदीद्वारे सव्वा कोटींचा दंड वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
शहरामधील बेशिस्त वाहनचालकांवर तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने लक्ष (सीसीटीव्ही) ठेवले जाते. बेसावधपने वाहन चालवून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना एसएमएसव्दारे दंडाची पावती पाठवली जाते. अशा वाहनचालकांना विशिष्ट तारखेत दंड भरण्याचे सांगीतले जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून दंड भरण्यास टाळाटाळ करनाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 6 फेब्रुवारीपासून कारवाई सुरू केली आहे. यासाठी शहरात नाकेबंदी करून 44 हजार 521 गाड्यांवर कारवाई करत 1 कोटी 37 लाख 21 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सिग्नल मोडणे, नियमांना डावलून वाहन चालवने अशा सर्वांवर सीसीटीव्ही च्या मदतीने नजर ठेवली जाते. अशा चालकांना एसएमएसच्या माध्यमातून दंड आकारला जातो. मात्र, ऑनलाईन दंड आकारलेल्या वाहनचालकांची संख्या मोठी असून त्यांच्याकडून वेळेत दंड भरला जात नाही. त्यामुळे दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेने शहरात 6 फेब्रुवारीपासून प्रलंबीत दंडाची निकाली काढण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहराच्या विविध भागात दररोज दोन तास नाकाबंदी –

यासाठी वाहतूक शाखेच्या सर्व विभागांकडून रोज एकतास नाकाबंदी केली जात आहे. यामाध्यमातून सर्वांची तपासणी करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. 6 तारखेपासून आजपर्यंत 44 हजार 521 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास सव्वा कोटी दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर असून नियम मोडणाऱ्या वाहनांना दंडाची रक्कम एसएमएसव्दारे कळवली जाते. दंडाचा रक्कम वाहनधारकांना जवळच्या विभागात स्वतः जाऊन भरावी लागते. मात्र, दंड न भरणाऱ्यांवर नाकाबंदी करून दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. दंड हा पर्याय नसून बाद स्वतः हून वाहतूकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.