विठ्ठल माझिरे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

भुकूम गावचे वस्ताद विठ्ठल धोंडिबा माझिरे (वय ७८) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात, विविध गावातील यात्रांमधील आखाड्यात जाऊन मल्लांना मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असायचा. तसेच पोलीस अधीक्षक पुणे कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक अशोक माझिरे यांचे ते वडील होते.