विषय समितीच्या सभापती पदासाठी ‘यांचे’ अर्ज दाखल

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील विधी समिती,महिला बाल कल्याण,शहर सुधारणा आणि क्रीडा समिती या चार समितीच्या सभापतीची कार्यकाळ संपल्याने सत्ताधारी भाजपाच्या चार नगर सेवकांनी सभापती पदासाठी नगर सचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत.यावर १० मे रोजी शिक्का मोर्तब होणार असून विषय समित्यांची निवड प्रक्रिया बिनविरोध होणार असल्याचे बोलल जात आहे.

चिंचवड मधून माधुरी कुलकर्णी यांनी विधी समितीच्या सभापती पदासाठी तर चिखली मोरेवस्ती मधून स्विनल म्हेत्रे यांनी महिला बालकल्याण,नवी सांगवी मधून सीमा चौगुले यांनी शहर सुधारणा तर चिखली मधून संजय नेवाळे यांनी क्रीडा समितीच्या सभापती पदासाठी आज दाखल केला आहे.दोन्ही आमदारांना दोन याप्रमाणे सभापती पद वाटप करण्यात आले आहे.यावर १० मे रोजी शिक्का मोर्तब होणार आहे.