‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची पूर्ण माहिती न दिल्याने सत्ताधारांमध्ये मतभेद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

वेस्ट टू इनर्जी’ प्रकल्पांवरुन सत्ताधारी भाजपमध्ये गटातटाचे राजकारण निर्माण झाले आहेत. या प्रकल्पांसाठी महापालिका पालिका कोट्यावधी रुपये खर्च करणार आहे. परंतु,प्रकल्पाची सविस्तर माहिती न दिल्याने भाजपच्याच नगरसेविकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची योग्य माहिती द्यावी अन्यथा प्रकल्पाला विरोध दर्शविणार असल्याची भूमिका भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.

पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत ‘वेस्टू टू इनर्जी’चा 208 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने आज प्रकल्पाला मान्यता देखील दिली आहे.  या प्रकल्पासाठी पालिकेची जागा 21 वर्षासाठी प्रकल्पास दिली जाणार असून राडारोडा प्रकल्प देखील सुरु केले जाणार असून मान्यतेसाठी हे प्रस्ताव शुक्रवारी महासभेसमोर ठेवले आहेत.

एकीकडे प्रकल्पाला मान्यता दिली गेली खरी मात्र दुसरी कडे भाजपच्याच नगरसेवकांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली न गेल्याने भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी वेस्ट तू इनर्जी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
नगरसेविका बारणे म्हणाल्या, ”महापालिकेच्या कच-याच्या निविदेच्या तक्रारी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे गेल्या. त्याबाबत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला. त्यामुळे शहराची आणि भाजपची नाहक बदनामी झाली आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून ती निविदा रद्द केली. त्यापार्श्वभुमीवर महासभेसमोर आलेले   ‘वेस्ट टू इनर्जी’, राडारोडा प्रकल्पांचे विषय अशाच प्रकारचे आहेत का? याचा संशय निर्माण होत आहे. महापालिका घनकच-याच्या विघटनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानवर आधारित ‘वेस्टू टू इनर्जी’ प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प 208 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पासाठी पालिका हिस्सा म्हणून 50 कोटी दिले जाणार आहेत. या प्रकल्पाचा ठेकेदार 208 कोटी रुपयांमध्ये नेमके काय काम करणार आहे.

प्रकल्पासाठी लागणारी मशिनरी खेरदी ,  त्याची किंमत काय? आहे. कचरा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या राकेचे विघटन कसे करणार? पर्यावरणावर होणारा परिणाम काय? किती प्रमाणात वीज निर्मिती होणार असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्वांची माहिती नगरसेवकांना दिली गेली नाही.

महापौर नितीन काळजे यांना प्रकल्पाबाबद कार्यशाळा घेण्यासाठी आणि प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या कार्यशाळा घेण्याबाबत  पत्र दिले आहे. कार्यशाळेत आमच्या प्रश्नांचे निराकरण झाल्यास प्रकल्पाला आमचा विरोध दर्शीविणार नसल्याची माहिती माया बारणे यांनी दिली.