वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये नोकरीच्या अमिषाने कोटयावधींची फसवणुक

पुणेः पोलिसनामा आॅनलाईन

राज्यातील 16 वैद्यकिय शिक्षण महाविद्यालयांमध्ये विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिषाने राज्यातील आठशे उमेदवारांची सुमारे तीस कोटींची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घोटाळयाचा मुख्य सूत्रधार भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे महामंत्री जितेंद्र बंडु भोसले असल्याचा आरोप ‘माजी सैनिक विकास परिषद’चे अध्यक्ष सुधाकरन पणीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी फसवणुक करण्यात आलेल्या महिला उमेदवार सारीका चव्हाण, मधुकर भाकरे आदी उपस्थित होते. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना गुन्हे दाखल करण्याचे निवेदन दिले आहे.

या घोटाळयामध्ये राज्यातील वैद्यकिय शिक्षण विभागातील 16 महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, इलेक्ट्रीशियन अशा विविध पदांसाठी जागा सूटल्याचे या उमेदवारांना विविध एजंटांनी सांगितले. त्यांना खरे वाटावे म्हणुन राज्य शासनाचे 18 जुलै 2016 चे नोकरी संदर्भातलेे परिपत्रक दाखवले. इतकेच नव्हे तर वैद्यकिय शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रवीण शिनगारे व मंत्री गिरीष महाजन यांच्या सहींचे परिपत्रके दाखवून उमेदवारांचा विश्‍वास संपादन करण्यात आला.

हा घोटाळा 2016 पासून 2018 च्या दरम्यान घडला आहे. यामध्ये बीड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, सोलापूर येथी जास्त उमेदवारांची फसवणुक झाली आहे. तरुणांचा विश्‍वास पटण्यासाठी काही उमेदवारांच्या पुण्यातील ससून रुग्णालय या ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. नंतर हा प्रकार खोटा असल्याचे आढळून आले असल्याचे पणीकर यांनी सांगितले.

राज्यभराची व्याप्ती असलेल्या या करोडोंच्या घोटाळयामध्ये राज्यातील वैद्यकिय शिक्षण विभागातील 16 महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, इलेक्ट्रीशियन अशा विविध पदांसाठी जागा सूटल्याचे या उमेदवारांना या रॅकेटमधील एजंटांनी सांगितले. त्यांना खरे वाटावे म्हणुन राज्य शासनाचे 18 जुलै 2016 चे नोकरी संदर्भातलेे परिपत्रक दाखवले. तसेच वैद्यकिय शिक्षण संचालनालयाचे (डीएमईअार) मंत्री गिरीष महाजन यांच्या सहीचे लेटरहेड, ‘डीएमईआर’ चे संचालक प्रवीण शिनगारे यांच्या सहींचे परिपत्रक दाखवून उमेदवारांचा विश्‍वास संपादन करण्यात आला. हा प्रकार 2016 पासून 2018 च्या दरम्यान घडला आहे. यामध्ये बीड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, सोलापूर येथील जास्त उमेदवारांची फसवणुक झाली आहे.

ब-याच उमेदवारांच्या मुलाखती ससून रुग्णालयातील एका रुममध्ये घेण्यात आल्या. तसेच महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर निवड लावण्यात आली. त्यांना दोन महिन्यांनी ऑगस्ट 2017 मध्ये नियुक्तीपत्र दिले.  त्यांच्याकडून तीन ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळली. उमेदवारांनी भोसलेंना फोन केला असता त्यांनी सध्या मंत्री व्यस्त आहेत, अधिकारी रजेवर आहेत अशी कारणे सांगत फसवणूक केली. यानंतर काही उमेदवार भोसले यांच्याकडे मुंबईला गेले असता त्यातील भोकरे या उमेदवाराच्या नातेवाईकाला भोसले यांनी पैसे परत देतो असे सांगुन गाडीत बसुन नेले. यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन जीवे मारण्याचा दम दिला. तर पैसे परत देतो असे बंद खात्याचे धनादेश दिले, असा आरोपही पणीकर यांनी केला आहे.

ससूनचा संबंध नाही

” मुलाखती ससूनच्या आवारात झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. गेल्यावर्षी जुलै महिन्यात एक उमेदवार बोगस नियुक्तीपत्र घेउन वैद्यकिय महाविद्यालया आला असता त्याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच याचा अहवाल ‘डीएमईआर’ ला कळवण्यात आला आहे. तसेच त्याचवेळी विद्यालयाच्या नोटीसबोर्डवर एक उमेदवारांची यादी लावली होती ती लगेच काढून टाकली”.

– अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ससून रुग्णालय