शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध, पत्नीचा समाजमाध्यमांवरून आरोप

मुंबई : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला. हा केवळ शाब्दिक आरोप नसून शमीसोबतचे खासगी संभाषणाचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले.

हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट शेअर केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. मोहम्मद शमी सध्या धर्मशालामध्ये आहे.
शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. ‘एबीपी आनंदो’चे पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीनजहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक खाते स्वतः:चेच असल्याचे सांगितले. मोहम्मद शमीचे लग्न 2014 मध्ये झाले त्यांना आयरा ही एक मुलगी आहे.

पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख?
हसीन जहांने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख केला आहे. फेसबुक पोस्टमध्ये संबंधित महिलांची नावं स्पष्ट दिसत आहेत. एका फोटोमध्ये तर सांबामध्ये राहणारी एक महिला शमीची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावाही हसीनजहांने केला आहे. एक तरुणी ‘आय मिस यू’ असा मेसेज शमीला करते, त्यावर ‘कम टू माय रुम’ असा रिप्लाय तो करताना दिसत आहे.

पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख?

हसीनजहांचे आरोप
मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहांने अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे ती सांगते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला. शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा हसीन जहांने केला.