शरद पवार म्हणतात…. साखर कडू होणार

बारामतीः पोलीसनामा आॅनलाईन

जागतिक बाजापेठेचा मंदावलेला वेग आणि मोठ्याप्रमाणात वाढलेले ऊसाचे उत्पादन, या दोन्ही गोष्टींचा गंभीर परिणाम साखर व्यावसायावर होत असून पुढील वर्षी साखर उद्योगावर मोठे संकट येणार असल्याचे भाकित माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले आहे. तसेच केंद्र सरकारने ठरवून दिलेला दर एफआरपीनुसार कारखाने शेतकऱ्यांना देऊ शकणार नाहीत असे ही पवार म्हणाले आहेत. बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्कार वितरण प्रसंगी पवार बोलत होते.

आज शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्काराचे वितरण झाले. पवार पुढे बोलताना म्हणाले की पुढील वर्षी साखरेला 2500 रुपयांपर्यंतच दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे पैसे देने शक्य होणार नाही. पुर्वी भारत जगातील साखर आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता. मात्र साखर उद्योगात झालेली प्रगती पाहता भारताची अोळख निर्यातक म्हणून झाली आहे. तसेच जगातील साखर उत्पादक देशांनी प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादित केल्याने जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट तयार झाले आहे. याचा परिणाम भारतातील साखर उद्योगावर होतो आहे