शरीर डिटॉक्स करण्याचा हा आहे उपाय, होतील हे 6 आरोग्यदायी फायदे, नेहमी राहाल आजारांपासून दूर

आपण जे अन्नपदार्थ सेवन करतो त्यापैकी काही घटकांचे रुपांतर टॉक्सिन्समध्ये होते. शरीर डिटॉक्स करण्याचे विविध उपाय आहेत, त्यापैकी घरी करता येण्यासारखा आणि सोपा उपाय म्हणजे उपवास करणे. काहीकाळ उपाशी राहिल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर निघून जातात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या रिसर्चनुसार उपवास केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कारण उपवासात शरीरातील उर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान शरीरात होणारे बदल मृत पेशींचे इम्यून सेल्स रिसायकल होण्यास कारणीभूत ठरतात.

असा करा उपवास
फास्टींग करत असाताना रात्री उशीरा जेवण करणार्‍यांनी सकाळी नाश्ता वेळेवर घ्यावा. दुपारचे जेवण घ्यायचे व रात्रीचे जेवण घेणे बंद करायचे. सुरूवातीला डोकेदुखी, पित्त हे जाणवू शकते. त्यासाठी सतत पाणी पित राहावे. सुरूवातीला जेव्हा आपण पहिल्या खाण्याची वेळ पुढे ढकलतो तेव्हा ती वेळ पाळणे महत्वाचे असते. भूक लागल्यास पाणी प्यावे, बरेचदा त्यामुळे भूक कमी होते. गरोदर महिलांनी, बाळाला स्तनपान करणार्‍या महिलांनी, लहान मुले, ब्लड प्रेशर, टाईप 1 डायबिटीस असलेल्या लोकांनी हे फास्टींग डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

हे आहेत फास्टींगचे फायदे

1 न्युरॉनसाठी उपयुक्त अशा किटोन बॉडीज तयार होतात.

2 चिडचिड कमी होते.

3 वजन कमी होते.

4 फर्ट्स बर्न होण्यास सुरूवात होते.

5 आकलन व स्मरणशक्ती वाढते.

6 डीएनए दुरूस्तीकामाची कार्यक्षमता वाढते.