शशी थरूर यांनी दिल्ली पोलिसांचे आरोप फेटाळले

वृत्तसंस्था :

हाय प्रोफाइल सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणात आज (सोमवार) दिल्ली पोलिसांनी शशी थरूर यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या तीन हजार पानी आरोपपत्रात सुनंदा यांचे पती आणि खासदार शशी थरुर यांना आरोपी बनवण्यात आले आहे.

पोलिसांनी लावलेले हे आरोप खासदार शशी थरुर यांनी फेटाळून लावले आहेत. त्यांनी आरोपपत्र दाखल केल्याचे वृत्त समजताच , आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत आपण त्याविरोधात कायदेशीर लढाई लढू असे सांगितले आहे. तसेच मी सुनंदाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करेन यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे थरूर यांनी केलेल्या ट्विटद्वारे सांगितले आहे.

तसेच दिल्ली पोलिसांच्या तपास करण्याच्या पद्धतीवर आणि हेतूबद्दलही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चार वर्षांच्या तपासानंतर दिल्ली पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचल्याने त्यांच्या हेतूबद्दल प्रश्न निर्माण होतोअसे थरूर म्हणाले.

 

संबंधित घडामोडी:

सुनंदा पुष्कर प्रकरणी पुन्हा एकदा शशी थरूर अडकले