शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे हक्क हिरावून घेऊ नका : सुप्रिया सुळे

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन

केंद्र आणि राज्य सरकारने निवडणुकीमध्ये अनेक घोषणा केल्या.मात्र त्या घोषणाच राहिल्या असून त्याची अमलबजावणी करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. तर ज्या सर्व सामान्य नागरिकांच्या मतावर हे भाजप सत्ते आले आहे. त्यांनाच ते विसरले असून नागरी हिताचे निर्णय घेताना हे सरकार दिसत नाही. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. तर आता हेच भाजप सरकार राज्यातील काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे.तो निर्णय योग्य नसून या शाळामध्ये जाणार सर्व सामान्य घरातील विद्यार्थी असल्याने त्याचा हक्क देशातील कोणी ही हिरावून घेऊ शकत नाही. अशा शब्दात सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली.
तर त्या पुढे म्हणाल्या की,जर तुम्हाला सुविधा आणि योजना राबविता आल्या नाही. तर आता सर्व नागरिक आणि विद्यार्थीचे हक्क हिरावून घेऊन नका असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की,या पुढील काळात आणखी तीव्र लढा उभारला जाईल.असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

पुण्यातील एसएसपीएमएस कालेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास अभिवादन करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली अस्मिता परिषद आणि अस्मिता परिषदेचा मोर्चा लाल महालावर काढण्यात आला.यावेळी लाल महालात भाजपने निवडणुकी पूर्वी दिलेल्या आश्वसनाची कोणत्याही प्रकारची अमलबजावणी न केल्याने त्याच्या निषेधार्थ लाल महालात 30 मिनिट मौन बाळगत निषेध व्यक्त करण्यात आला. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.