शाॅर्टसर्किटमुळे यमुनानगर वसाहतील घराला आग

पुणेः आॅनलाईन पोलीसनामा
विमाननगर येथील सम्राट चौक,यमुनानगर वसाहती मधील एका घराला शाँर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य व वस्तू जळून खाक झाले. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत घरातील गँस सिलेंडरचा देखील स्फोट झाला.

या दुर्घटनेची नगरसेवक राहूल भंडारी यांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार बंबांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. शाँर्टसर्किटमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते.अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी बचावकार्यासाठी मदत केली.