शिवसृष्टी आणि मेट्रो डेपोच्या जागेसंदर्भातील निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार! : खासदार संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ऐतिहासिक शिवसृष्टीसाठी बीडीपीची 50 एकर जागा व पुणे मेट्रोच्या डेपोसाठी कोथरुड येथील कचरा डेपोची जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निर्णय घेतला. याबद्दल खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. 18 नोव्हेंबर 2017 रोजी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून शिवसृष्टीसाठी बीडीपीची जागा द्यावी व कचरा डेपोच्या जागेवर पुणे मेट्रोचा डेपो करावा असा तोडगा सर्वप्रथम सूचविला होता. आजच्या निर्णयामुळे काकडे यांच्या तोडग्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट होत आहे.

कोथरुडमधील ऐतिहासिक शिवसृष्टी व मेट्रो डेपो यांच्या जागेविषयीच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे आज अखेर पडदा पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीवर ही शिवसृष्टीसाठी होत असल्याने शिवप्रेमींच्या मनामध्ये त्याविषयी मोठी आस्था आहे. तसेच, वाहतूक कोंडीतून पुण्याची सुटका करण्यासाठी मेट्रोचा डेपो होऊन त्याचे काम गतीने मार्गी लागणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींवरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपात शिवसृष्टीला बीडीपी ची जागा द्यावी व कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो डेपो करावा, अशी मागणी राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 18 नोव्हेंबर 2017 रोजी पत्राद्वारे सर्वप्रथम केली होती. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.

पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता मेट्रोचे काम वेळेत होणे आवश्यक आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असून त्यास आणखी गती मिळण्यासाठी कचरा डेपोची जागा मेट्रोला त्वरित मिळणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात निर्णयही झाला होता. मात्र अद्याप त्या जागेचे हस्तांतरण पुणे मेट्रोला झालेले नाही. तसेच, कचरा डेपोच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या शिवसृष्टीसाठी कोथरुड येथीलच बीडीपीची जागा देण्यात यावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याकामी स्वत: जातीने लक्ष घालावे आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यास सूचना कराव्यात, असे खासदार काकडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.

कचरा डेपोची जागा पुणे मेट्रोला व बीडीपीची जागा शिवसृष्टीला मिळणार असल्याने दोन्ही विकासकामे मार्गी लागतील. कोथरुडच्या व पर्यायाने पुण्याच्या वैभवात त्याने भरच पडणार असल्याचेही खासदार काकडे म्हणाले आहेत.

अधिक माहितीसाठी –