शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांचे ‘मार्गदर्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन बुधवारी, १९ जून रोजी होत असून यानिमित्त होणाऱ्या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले आहे. वर्धापन दिनाला दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याची शिवसेनेच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार आहे.

शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासह युवा नेते आदित्य ठाकरे यांचे प्रमुख भाषण होईल. लोकसभा निवडणुकी नंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कार्यक्रम होत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मनोमिलन नीती

लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत गेल्याचा फायदा शिवसेनेला झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याचे सेनेचे मनसुबे स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना वर्धापनदिनाला बोलावून आगामी शिवसेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. याची पूर्व तयारी म्हणजे ही मनोमिलन नीती असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन