शिवीचा जाब विचारल्याने मद्याची बाटली डोक्यात मारली

कासारवाडी : पोलिसनामा ऑनलाइन
पिंपरी-चिंचवडच्या कासारवाडीत ‘शिवी का दिली’ असे विचारल्याने चिडलेल्या एका इसमाने चक्क डोक्यात मद्याची बाटली डोक्यातवर मारली. या घटनेत फिर्यादी जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी जयकुमार कृष्णदेव त्रिंबके (वय:२९) यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. समीर सुर्यकुंज असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”कासारवाडी येथील द्वारका नगरी इमारतीच्या गच्चीवर फिर्यादी जयकुमार कृष्णदेव त्रिंबके (वय:२९ रा.सरिताकुंज सोसायटी,कासारवाडी पुणे) यांच्या मामाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीत मद्यपानाची सोया देखील होती. समीर सरीकुंज याने फिर्यादी जयकुमार कृष्णदेव त्रिंबके याला दारूचा नशेत शिवी दिली,फिर्यादी यांनी ‘शिवी का दिली म्हणून’जाब विचारल असता समीर सुर्यगंध याने फिर्यादी जयकुमार यांच्या डोक्यात मद्याची बाटली मारली. परत हाताने मारहाण केली यात जयकुमार हे जखमी झाले होते. हे दोघे ही ओळखीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीला अद्याप ताब्यात घेतलेले नाही. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.