शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणारा अनोखा ‘हेल्थ बार’

अशोक मोराळे

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

यापूर्वी आपण कॉफी बार, बिअर बार पाहिले असतील मात्र आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या बार बद्दल सांगणार आहोत. आणि हो तो पुण्यात आहे बरं का! अमेरीका, जपान, इंग्लड अशा अनेक देशात विमानतळ व शहरातील प्रमुख भागामध्ये ऑक्सीजन ‘हेल्थ बार’ आहेत. पुणे शहरात  शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणारा अनोखा हेल्थ बार लॉ कॉलेज रोडवर तुषार खोमने नावाचा अवलिया चालवतो. ग्रामीण भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा ऑक्सीजन मिळतो परंतू शहरातील वाढती प्रदुषणाची पातळी पाहता हवेतील ऑक्सीजन किती प्रमाणात शुद्ध आहे हा खरा संशोधनाचा प्रश्न बनला आहे.

25 वर्षे नोकरी केल्यानंतर काही तरी वेगळ करण्याच्या प्रतत्नातून खोमने यांनी लॉ कॉलेज रोडवर या अभिनव प्रयोगाला सुरूवात केली. बदलत्या जीवनशैलीनुसार नोकरदार वर्गामध्ये आरोग्य विषयक व मानसिक ताणतणावा विषयी अनेक समस्या जाणवतात. त्यामध्ये शुद्ध ऑक्सीजन हा महत्वाचा घटक असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. त्या माध्यमातून जन्म झाला तो ‘उज्ज्वल हेल्थ सोल्यूशन’ या स्टार्टअपचा.

आपल्या शरिराला उत्तमप्रकारे मेंटेन ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात शुद्ध ऑक्सिजनची गरज असते. आणि तो ऑक्सीजन आहार, पाणी, वातावरण या घटकांतून शरीर पूर्ण करते. ऑक्सीजन बारमध्ये अरोमा थेअरपी, क्रोमा थेरपी, मुझिक थेअरपी या पद्धतीचा वापर केला जातो.

ऑक्सिजनचे फायदेः

अधिक उर्जा मिळवण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी, रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सीजन आपल्याला फायद्याचा ठरतो.