श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची शुक्रवार पासुन यात्रा

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची याञा शुक्रवार(दि.३०) पासुन सुरु होत आहे. त्यानिमित्त शुक्रवार(दि.३०) रोजी सायंकाळी ७ वा. श्रींचा हळदी समारंभाचा कार्यक्रम होईल. शनिवार (दि. ३१) रोजी पहाटे ५ वाजता ह.भ.प.राहुल महाराज जराड(कानगाव ) यांचे हनुमंत जयंती निमित्त किर्तन होईल. सकाळी ६.३६ वा.हनुमान जन्म होईल. ७ वाजता श्रींची महाआरती होईल.त्यानंतर ७.३० ते ११ वा. च्या दरम्यान श्रींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा होईल. १२ ते ४ वा. भक्तांचे नवसाचे दंडवटाचे कार्यक्रम होतील.

सायंकाळी ६ ते ७. ३० वा. च्या दरम्यान सासवड,पेरणे,एलकेभादे,पारगाव,सिंगापुर,एखतपुर,मुंजवडी,न्हावरे,भोंडवेवाडी,कोथळे इ. मानाच्या कावडीचे स्वागताचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वा श्रींची महाआरती होईल.त्यानंतर ७.४५ वा काठ्यांचे श्रींच्या शिखराला लावण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर त्यानंतर ८. ३० ते १० वा. च्या दरम्यान अन्नपुर्णा ट्रस्ट माळवदकर बंधू यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.राञी १० ते ३ वा.च्या दरम्यान श्रींची पालखी मिरवणुक व छबिन्यांचा कार्यक्रम होईल. रविवार(दि. १) रोजी सकाळी ९ ते २ वा. या वेळेत कै. हिराबाई डोंगरे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. ४ ते ७ वा.या वेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल. राञी ९ वा. नंतर कै. हिराबाई डोंगरे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल.आशी माहिती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौंडकर यांनी दिली.