सनबर्न फेस्टिव्हलचे बोगस तिकीट विकणाऱ्या तरुणास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुण्यात झालेल्या सनबर्न फेस्टिवल मध्ये तिकिटात झालेल्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. मुंबईतील एका १८ वर्षीय तरुणास फसवणुकीसाठी वापरत असलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील उंड्री येथील एका तरुणाने सनबर्न फेस्टिवल चे तिकीट सनबर्गच्या फेसबुक पेज वर दिलेल्या नंबर वरून बुकिंग केले होते. फेसबुक वर असलेल्या सनबर्न पेज वरील नंबर वर पाच तिकीट बुक करून १८ हजार रुपये पेटीएम द्वारे पाठवले. सदर तरुण फेस्टिवलच्या ठिकाणी गेला असता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सायबर सेल येथे अर्ज दिला. त्यावरून कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला. फेसबुक पेजवरील मोबाइल नंबरचा तपास काढून पोलिसांनी आरोपीस नालासोपारा पश्चिम पनवेल मधून अटक केली. आरोपीकडून २ मोबाईल ,४ सिम कार्ड ,१ डेबिट कार्ड,२ पेन ड्राईव्ह ,१ लॅपटॉप ,१ सनबर्नचे कार्ड असा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहर व सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे यांचे मार्दर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे ,पोलीस उप निरीक्षक मंदा नेवसे, पोलीस हवालदार आत्तार ,पोलीस शिपाई अब्दागिरे, गावडे, बिचेवार ,दिवाने यांनी केली.

पुढील कार्यवाहीसाठी आरोपीस कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये वर्ग केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत. ९१७५५९०६३७,९१३०१८३७८१,७०५७४२१८३२ या नंबर वरून कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन सायबर सेल पुणे कडून करण्यात आले आहे.