समुद्रकिनारी बिकिनीसाठी मनाई : केंद्रीय पर्यटन मंत्री

नवी दिल्ली :वृत्तसंस्था
भारतातील कुठल्याच समुद्र किनाऱ्यावर भारतातील तसेच परदेशातील महिलांना बिकीनी घालता येणार नाही, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फोन्स यांनी प्रसिध्द केल्या आहेत.

के जे अल्फोन्स म्हणाले, ‘परदेशात पर्यटक रस्त्यावर बिकीनी घालून फिरत असतात. पण, भारतात असे करता येणार नाही. भारतात तुम्हाला बिकीनी घालून फिरता येणार नाही. भारतातील संस्कृतीप्रमाणेच वागणे योग्य असेल. लॅटीन अमेरिकेतील काही शहरात बिकीनी घालून फिरणे सामान्य असू शकते, पण, भारतात तुम्ही परंपरा आणि संस्कृतीचा मान ठेवला पाहिजे. मी असे म्हणत नाही की भारतात आल्यावर साडीच नेसा. पण, भारतात मान्य होईल, असा ड्रेस तुम्ही घातला पहिजे’, असे अल्फोन्स यांनी म्हटले आहे.

या पूर्वी देखील सरकारवर काय खावे हे ठरवण्यावर टीका झाली आहे, त्यानंतर आता देशात कोणते कपडे परिधान करावेत याविषयी टीका होणार आहे. या मार्गदर्शकाचा पर्यटन व्यवसायावर कसा परिणाम होतो हे देखील पाहावे लागणार आहे.