सरकार विरोधात विद्यापीठामध्ये काँग्रेसचे पकोडा सेंटर टाकून निषेध आंदोलन

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस कडून सुशिक्षीत बेरोजगार पकोडा सेंटर टाकून मोदीजींच्या ‘पकोडे बेचना भी रोजगार का साधन है ‘

या वक्तव्याचा प्रतीकात्मक निषेध केला. सरकारी असर्जनशीलता व बेरोजगार युवकांचे प्रश्न शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी तसेच प्रधानसेवकांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी काँग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र व राज्य सरकार विरोधी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या सोनालीताई मारणे ह्या म्हणाल्या सरकार शेतकरी ,व्यापारी , विद्यार्थी अशा सर्वच बाबतीत प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तर लोकांना २ कोटी रोजगाराचे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आले परंतु प्रत्यक्षात हे सरकार रोजगार देऊ शकले नाही , एमपीएससी मधील जागांचे प्रमाण व इतर नोकरभरतीतील मोठ्या कपातीमुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे की नाही असा प्रश्न विद्यापीठ विद्यार्थी काँगेसचे अध्यक्ष सतीश गोरे यांनी उपस्थित केला. पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष भूषण रानभरे, रोहन शेट्टी, आमिर पठाण, सतीश पवार, रुकसाना शेख, उमेश कुंभार, गीतांजली पुणेकर, अर्चना ढुमुरे,ओली व्हिया, अभिजित व अन्य पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.