सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नाही तर लष्कराने केला : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नाही तर लष्कराने केला आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच जवानांच्या नावाने मत मागण्या पेक्षा तुम्ही पाच वर्षात जनतेसाठी काय केले? आणि पुढील पाच वर्षात तुमचा काय अजेंडा आहे. तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर बोला. असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीच्या पचव्या टप्प्यातील मतदान येत्या ६ मे ला होणार आहे. दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी भाजपला हरवणे हाच कॉंग्रेसचा मुख्य उद्देश आहे. आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा हारणार असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. याचबरोबर, सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला नाही तर लष्कराने केला आहे. लष्कराचा कोणीही अपमान करू नये. असेही राहुल गांधी यांनी म्हंटले.

तसेच, देशात बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत यावर ते कधी बोलत नाहीत. जवानांच्या नावाने मत मागण्या पेक्षा तुम्ही पाच वर्षात जनतेसाठी काय केले? आणि पुढील पाच वर्षात तुमचा काय अजेंडा आहे हे तुम्ही सांगा. विरोधकांवर टीका केल्या पेक्षा तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर बोला. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, कॉंग्रेस पक्षाचा या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी हाच मुद्दा आहे. कॉंग्रेस सत्तेत आल्या नंतर न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे टाकण्यात येणार आहे. असेही त्यांनी म्हंटले. तसेच मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली परंतु चौकीदार चोर है या घोषणे बाबत नाही. मोदिनी हजारो कोटींची चोरी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.