सलमान खानने सहभाग नोंदवलेल्या दबंग इव्हेन्टमध्ये विना परवाना गाणे वाजल्या प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सिनेस्टार सलमान खान, कॅटरिना कैफ,सोनाक्षी सिन्हा, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभू देवा यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडलेल्या दबंग इव्हेन्टमधील गाणी विनापरवाना वाजवल्याचं आता समोर आल आहे. याप्रकरणी मोहम्मद सय्यद वय-२९ रा.अंधेरी,मुंबई यांनी हिंजवडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२४ मार्चला बालेवाडीच्या क्रीडा संकुलात दबंग इव्हेन्ट पार पडला होता. तेंव्हा त्यावेळी सारी के फॉलसे,काला चष्मा,स्वग से करेंगे स्वागत, दिल दिया गल्लान, धूम मचाले, जग घुमिया अशी सात ते आठ गाणी विना परवाना वाजवण्यात आली.हि गाणी यशराज,इरॉस आणि झी म्युझिक या कंपनीची होती.फोरपिलर्स इव्हेन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या गीतांचा परवाना घेण्यासाठी नोवेक्स कंपनीला तीन लाख रुपये देण्याचं ठरलं होतं.तसा धनादेश ही अदा केला, मात्र धनादेश न वटल्याने खात्यात रक्कम जमा झाली नाही, त्याचा धनादेश जाणीवपूर्वक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.फोरपिलर्स कंपनीने विश्वासघात करत,नोवेक्स कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी फोरपिलर्स कंपनीचे संचालक समीर दिनेश आणि व्यवस्थापक मनीष वर हिंजवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.अद्याप याना अटक केलेली नाही. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.