सांगवीत माजी नगरसेवकाकडून नैराश्येतून विकासकामांना आडकाठी 

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाईन

प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचेआणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवारपाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याचीभूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनीमहापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आलेल्यानैराश्येतून तसेच द्वेष आणि मत्सरापोटी स्मशानभूमी तसेचरस्त्यांची कामे अडविली आहेत. स्मशानभूमीसारख्याभावनिक मुद्द्यावर शितोळे राजकारण करत आहेत. त्यालाभीक न घालता प्रशासनाने सांगवी भागातील रस्त्यांची कामेतसेच स्मशानभूमीचे काम पूर्ण करून या भागातीलनागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या प्रभागाच्याज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोषकांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे यांनी महापालिकाआयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक ढोरे, कांबळे व नगरसेविका सोनवणे यांनी आयुक्त हर्डीकर यांचीभेट घेऊन निवेदन दिले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,“महापालिकेनेगेल्या पंचवार्षिकला प्रभाग क्रमांक ३२ मध्ये स्मशानभूमीउभारली आहे. या प्रभागातील नागरिकांची गरज लक्षातघेऊन स्मशानभूमीची आवश्यकता होती. त्यानुसार प्रशासनानेकार्यवाही करून नागरिकांसाठी स्मशानभूमी बांधली. परंतु, त्यासाठी बसविण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीत मयताच्याटाळूवरचे लोणे खाण्याचा प्रकार झाल्यामुळे या प्रभागाचीप्रचंड बदनामी झाली. या भ्रष्टाचाराचे पाप संबंधितांना फेडावेलागले. ही स्मशानभूमी बांधताना त्याला कोणीही आडकाठीआणली नाही. परंतु,

महापालिका निवडणुकीतील जय-पराजयानंतर स्मशानभूमीवरून नागरिकांना वेठीस धरण्याचेकाम सुरू आहे. पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून शितोळे याभागात होणाऱ्या रस्त्यांच्या कामांनाही आडकाठी निर्माणकरण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी या स्मशानभूमीचे कामअडविले आहे. सार्वजनिक असलेल्या रस्त्यांचा मोबदलामिळावा, या मागणीसाठी रस्त्यांची कामे त्यांनी अडविलीआहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मत्सर आणिद्वेषापोटी नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम त्यांच्याकडूनहोत आहे. या सर्व अडवाअडवीच्या राजकारणामुळे याभागातील नागरिक आगामी काळात त्यांचे जिरवण्याचे कामनिश्चित करतील. परंतु, या राजकारणाला महापालिकाप्रशासनाने बळी न पडता प्रभाग क्रमांक ३२ मधील कामेगतीने मार्गी लावावीत.

या भागातील सर्वच कामांसाठी महापालिका प्रशासनाकडेवारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी केवळ बघ्याचीभूमिका घेत आहेत.लोकहिताच्या कामासाठी कोणाच्यादबावाला बळी पडण्याची अधिकाऱ्यांना गरज नाही. त्यामुळेया बाबीची आपण स्वतः गंभीर दखल  घ्यावी. संबंधितअधिकाऱ्यांना कामे मार्गी लावण्यासाठी आपण आदेशद्यावेत. प्रभागातील नागरिकांची तातडीची गरज लक्षात घेऊनस्मशानभूमी उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.रस्त्यांची कामे अडविण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनानेसंबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करावी. यापुढेविकासकामे अडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यालारस्त्यावर उतरून उत्तर देण्याचा इशारा या चारहीनगरसेवकांनी दिला आहे.”