सात वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

सात वर्षीय सख्ख्या मामेबहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली. घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी आरोपींना बेदम मारहाण केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होत. नागरिक आणि आरोपींच्या झटापटीत एक आरोपी फरार झाला असून एकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हा प्रकार शनिवारी भीमनगर येथे घडली.

संदीप गंगाराम वानखडे (रा. भीमनगर) याला अटक केली. तर मामेभाऊ नागरिकांच्या झटापटीत पळून गेला.

पिडित मुलीची आई मनोरुग्ण असून तिला दोन भाऊ आहेत. या सर्वांचे संगोपन पिडित मुलीचा मामा करतो. पीडिताचा मामा कटला चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, तर त्याचा मुलगा संजय हा पन्नी वेचण्याचे काम करतो. शनिवारी सात वर्षीय पीडित मुलगी रडत असल्याचे परिसरातील एका महिलेच्या निदर्शनास आले. तिने पीडिताला प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस केली असता तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले. पिडित मुलीच्या मामेभावाने आणि त्याचा साथिदार संदीप या दोघांनी मुलीला एका झोपडीत नेले. त्याठिकाणी दोघांनी रात्रभर तिच्यावर आत्याच्यार केले. तसेच या घटने विषयी कोणाला सांगितले तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
ही गंभीर बाब महिलेच्या लक्षात येताच तिने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी मुलीने सांगितलेली सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी एकाला अटक केली असून दुस-याचा शोध सुरु आहे.

आरोपींना नागरिकांकडून चोप

सात वर्षीय बालिकेच्या लैंगिक शोषणाची वार्ता पसरताच नागरिकांनी दोन्ही आरोपींना पकडून चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक मनीष ठाकरेंसह पोलिसांचा ताफा पोहोचला. पोलिसांनी संदीप वानखडेला अटक केली. पसार अजय भटकरच्या शोधात गाडगेनगर ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.