सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व डेमोक्रेटिक स्पेससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एकूण सहा विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थ्यांच्या बुलंद अावाजासाठी व हुकुमशाही प्रशासनाच्या विरोधात नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून संविधानिक हक्कासाठी आवाज उठविला आहे. विद्यार्थ्यांच्या संविधानिक हक्क म्हणजेच अनिकेत कॅन्टीनचा डेमोक्रेटिक स्पेस  मिळवून  देण्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुढील सहा संघटनांनी सहभाग घेतला, एन.एस.यु.आय, एस.एफ.आय, मुक्तीवादी, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, भारतीय विद्यार्थी मोर्चा, डापासा