सासूच्या सांगण्यावरून भावानेच केला सख्या भावाचा खून

श्रीगोंदे : पोलिसनामा ऑनलाईन
भविष्यात भाऊ जमिनीच्या वाट्यात वाटेकरी होऊन तो डोईजड होईल, असे सांगत सासूने जावयाचे कान भरले. यामुळे सख्खा भाऊ आणि वहिनीने मिळून पाच वर्षीय भावाचा खून केल्याची घटना गेल्या वर्षी तालुक्यातील भिंगाण येथे घडली होती. पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणे या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात शांतीलाल पाखरे, काजल पाखरे व संगीता तांबे यांना अटक केली आहे.

वडील बापू पारखे यांच्या फिर्यादीवरून १३ सप्टेंबर २०१७ रोजी बाल्या बापू पारखे (वय : ५) या बालकाचा अपहरणाचा गुन्हा नोंद झाला होता. मात्र पोलिस तपासात या लहान मुलाचा त्याच्याच भावाने व वहिनीने संपत्तीसाठी खून केल्याचे सिद्ध झाले.