सुरुवातीला इंग्लिश आणि हिंदी येत नसल्याने मला घाटी म्हणायचे : ललिता बाबर

पुणे पोलिसनामा ऑनलाईन :

‘धावपटू म्हणून अगदी सुरुवातीच्या काळात मी बंगळूरला सरावासाठी होते. तेव्हा कोच इंग्लिशमध्ये बोलायाचे तर काही जण हिंदी मधून बोलायाचे. त्या दोन्ही भाषा मला बोलता येत नव्हत्या. त्यामुळे मला घाटी म्हणून बोलायाचे.’ अशी आठवण आंतरराष्ट्रीय धावपट्ट ललिता बाबर यांनी पुण्यातील न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे देण्यात येणार आदर्श युवा पुरस्कारावेळी सांगितली.

न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिस-या युवा संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुमार सप्तर्षी, माजी खासदार विजयकुमार गावीत, काका पवार, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. उदघाटन समारंभामध्ये आदर्श खासदार पुरस्कार डॉ.हिना गावीत, संग्राम थोपटे, आदर्श नगरसेवक गोपाळ चिंतल, आदर्श सरपंच ॠतुजा आनंदगांवकर, आदर्श युवा पुरस्कार धावपटू ललिता बाबर यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी हे पुरस्काराचे स्वरुप होते. सोड नाराजी, घे भरारी हे युवकांना संदेशपर सत्र यावेळी झाले.

यावेळी ललिता बाबर म्हणाले की,साताऱ्यातील एका छोट्याश्या गावामधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले.या सुरुवातीच्या काळात म्हणजे मी जेव्हा दहावीत होते. त्यावेळी शिक्षकांनी आई आणि बाबांना सांगितले.की मुलीचे दहावीचे वर्ष आहे तर तिला खेळाकडे लक्ष द्यावे.यावर घरच्यांनी खेळू नकोस म्हणून सांगितले.तेव्हा मी शाळेत जाणार पण नाही आणि खेळणार देखील नाही.असे सांगून टाकले.त्यानंतर मी दहा दिवस शाळेत पण गेले नाही आणि सराव देखील केला नाही.मात्र त्यानंतर अखेर घरच्यांनी मला सराव करण्यास परवानगी दिल्यावर मी सराव करण्यास सुरुवात केली.तेव्हा एकच सांगितले की,मी तुमचे नाव गमावणार नाही तर कमविले अशी गवाही दिल्याचे सांगताना त्या गहिवरून आल्या होत्या.

तर त्या पुढे म्हणाल्या की,हा खडतर प्रवास इथेच संपला नाही.तर पुढे सराव करताना कपड्यावरून देखील गावातील लोक बोलायचे मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचू शकले.तर आता ग्रामीण भागातील तरुणाई चा विचार करीत येत्या काळात अकॅडमी सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.