सुवर्णा मुजूमदार मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन

नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने मृत्यू झालेल्या सुवर्णा मुजूमदार प्रकरणात संबंधीत मांजा विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पतंग उडविणाऱ्या पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी मुजूमदार यांचा गळा मांज्याने कापला गेला होता. रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे प्रकरण पुणे पोलिसांनी अतिशय गांभिर्याने घेतले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नायलॅान मांज्याच्या विक्रीवर बंदी घातली असताना देखील शहरातील काही दुकादार खुलेआम नायलॅान मांज्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.अशा विक्रेत्यांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात येणार आहे. मुजूमदार यांच्या मृत्यूला संबधित मांजा विक्रेते जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. नायलॅान मांज्यामुळे मुजूमदार यांच्या मृत्यूमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ताब्यात घेतलेली सर्व मुले ही अल्पवयीन आहेत. त्याच बरोबर त्यांच्या पालकांना देखिल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बाेलावण्यात आले असून, त्यांची कसून चाैकशी चालू आहे. या मुलांनी हा मांजा नेमका कोणत्या दुकानातुन खरेदी केला याची चाैकशी करण्यात येत आहे. तसेच संबधीत दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.