सोलापूर जिल्ह्याचा प्रवास वाळवंटाच्या दिशेने

सोलापूर : पोलिसनामा अॅनलाईन

सोलापूर जिल्ह्यातील वनक्षेत्राचा विचार केला असता जिल्ह्यात अर्धा टक्काही वनराई नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा प्रवास हा वाळवंटाच्या दिशेने सुरु आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात सोलापूर जिल्ह्यात केवळ 0.36 टक्के वनराई असल्याची माहिती राज्याच्या वनसंरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. एकंदर राज्यातील वनराई क्षेत्राचा विचार केला असता गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 70 टक्के वनराई असून पुणे जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या 8.40 टक्के एवढे आहे. राज्यात सध्या भौगोलिक क्षेत्राच्या 20.01 टक्के क्षेत्रफळावर वनराई पसरलेली आहे.