हत्या, पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड : आ.शिवाजी कर्डीलेंसह ५३ जण फरार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. त्यावेळी आमदार शिवाजी कर्डीले आणि त्यांचे २५० ते ३०० कार्यकर्त्यांनी अधीक्षक कर्यालयात घुसून कर्मचा-याना शिवीगाळ केली. तसेच अधीक्षक कार्यालयावर दगडफेक करुन कार्यालयाचे नुकसान केले. याप्रकरणी आमदार कर्डीले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आमदार शिवाजी कर्डीले आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणातील काही आरोपी असे मिळून एकूण ५३ जण फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची हत्या घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हत्या आणि सरकारी कामात अडथळा अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना फरार घोषीत करण्यात आले आहे.

आमदार शिवाजी कर्डीले आणि त्यांच्या कर्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अनधिकृतरित्या प्रवेश करुन कार्य़ालयाची तोडफोड केली. तसेच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचा-यांना शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तर पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक संदीप घोडके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. घोडके यांनी दिलेल्या फिर्यादेवरुन आमदार शिवाजी कर्डीले, दादाभाऊ कळमकर, कैलाश गिरवले, सचिन जगताप, अभिजित कळमकर, बाळासाहेब गाडाळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखील वारे यांच्यासह २५० ते ३०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची शनिवारी (दि.7) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आज दिवसभर नगरमध्ये तणाव पाहण्यास मिळाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप वर त्यांनी सडकून टीका केली.शिवसेनेचे संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची शनिवारी (दि.7) हत्या केल्यावर या विरोधात संजय कोतकर यांच्या मुलाने फिर्याद दिली आहे.त्यामध्ये आमदार संग्राम अरुण जगताप, आमदार अरुण बलभीम जगताप, आमदार शिवाजी कर्डीले, भानुदास एकनाथ कोतकर, संदीप एकनाथ कोतकर यांच्या सांगण्यावरून विशाल बाळासाहेब कोतकर, औदूंबर बाळासाहेब कोतकर, बाळासाहेब एकनाथ कोतकर, रवी खोल्लम, अशोक मोहन कराळे, नवनाथ मोहन कराळे, मोसीन शेख, विजय एकनाथ कराळे, रमेश तात्यासाहेब कराळे, शरद रामचंद्र जाधव, संदीप बाळासाहेब गिऱ्हे, दादा बन्शी येणारे, विनोद लगड, मनोज भाऊ कराळे, भानुदास कोतकर उर्फ बीएम, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पोपट पवार, संकेत शरद लगड, बाबासाहेब बापू लगड, राजू गांगड, आप्पा दिघे, बाबूराव रामभाऊ कराळे, ज्ञानेश्वर यादव कराळे या तीस जणा विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, भानूदास कोतकर उर्फ बीएम यांना अटक केली.

आमदार संग्राम जगताप याला पोलिसांनी अटक करुन आज न्यायालयासमोर हजर केले असता. त्याच्यासह इतर तिघांना १२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी (दि.7) झालेल्या दोन शिवसैनिकाच्या हत्येमुळे नगरमध्ये तणावाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.

संबंधित घडामोडी:

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापांसह चौघांना अटक

शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या

पोलिसांवर हल्ला,नगरचा उत्तरप्रदेश झालाय : रामदास कदम