हार्दिक पटेलच्या बहीणीच्या लग्नाचा खर्च 10 कोटी

अहमदाबाद: गुजरातमधील विधानसभा संपवून महिने उलटले मात्र आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरुच आहेत. गुजरात मधील तरुण नेते हार्दिक पटेल यांच्यावर बहीणीच्या लग्नात वारेमाप खर्च केल्याचा आरोप झाला आहे. भाजप नेते रोहित चहल यांनी आरोप केला आहे की हार्दिक यांच्या बहीणीच्या लग्नात 10 कोटी रुपये खर्च झाले. त्यासोबतच मोनिका पटेलच्या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रोहित यांच्या आरोपानंतर हार्दिक पटेल म्हणाला, ‘तुमच्याकडे इन्कम टॅक्स ऑफिस आहे, सीबीआय आहे, सर्व संस्थांना चौकशीचे आदेश द्या. गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल हा तरुण चेहरा म्हणून समोर आला होता. पाटीदारांच्या आंदोलनामुळे गुजरातमध्ये मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते.