११ महिन्यात तब्बल १३५० एन्काउंटर

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या काळात गेल्या ११ महिन्यात साधारण १३५० एनकाऊंटर केल्याचे समोर आले आहे. तर ३०९१ फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील ५० टक्के आरोपींवर बक्षीस लागू होते, पोलीस यांच्या शोधात होते असे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आकड्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे. १० महिन्यात ५४०९ गुन्हेगारांनी न्यायालयातून मिळणारा जामीनच रद्द केलाय.
बाहेर येऊन गोळी खाण्यापेक्षा आत राहणे त्यांना सुरक्षित वाटत असावे. युपी पोलिसांच्या बंदुका त्यांच्या मनाप्रमाणे वापरतात असे म्हणले जाते.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरू असलेल्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह ही उपस्थित केले जात आहेत. यूपीतील राज्य मानवाधिकार आयोगाने गुन्हेगार आणि पोलिसांच्या चकमकीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोणताही गुन्हा नसताना पोलिसांनी खोटे इन्काऊंटर केल्याचा आरोप मारल्या गेलेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.