धक्कादायक ! भावाने टीव्हीचा रिमोट न दिल्याने बहिणीची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहिण भावाच्या नात्यामध्ये किरकोळ कारणावरुन भांडण होत असते. मात्र, दिल्लीमध्ये भावाने टीव्हीचा रिमोट न दिल्याने बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भावाबरोबर टीव्हीच्या रिमोटवरुन झालेल्या भांडणातून १२ वर्षाच्या मुलीने स्वत:ला बेडरुमध्ये कोंडून घेतलं आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाकचे चार खतरनाक दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय 

दिल्लीच्या उत्तरपूर्व भागातील सीलमपूर येथे ही घटना घडली. आई-वडील घरी नसताना मुलीचं तिच्या 7 वर्षाच्या लहान भावासोबत रिमोट वरून भांडण सुरू झालं. आवडता कार्यक्रम पाहण्यासाठी बहिणीने रिमोट मागितला, पण भावाने चॅनल बदलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ त्याच्या खोलीत अभ्यास करत होता. भांडणाचा आवाज ऐकून मोठ्या भावाने हस्तक्षेप करत दोघांना शांत केलं. पण संतापलेल्या बहिणीने त्यानंतर बेडरूममध्ये स्वत:ला कोंडून घेतलं.

गांजाची शेती करणारे पोलीसांच्या जाळ्यात, तब्बल १ कोटींचा गांजा जप्त 

छोट्या भावाने दरवाजा उघडण्यासाठी आवाज देण्यास सुरुवात केली. पण आतून बहिणीचा आवाज येणं बंद झाल्यानंतर त्याने हा प्रकार मोठ्या भावाला सांगितला. मोठ्या भावाने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा बहिणीने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. त्याने तातडीने तिला खाली उतरवले. आई-वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी तिची प्रकृती आणखी खालावली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.