१३ व्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडून तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा  ऑनलाइन 

पुणे – बालेवाडी येथील 43 प्रायव्हेट या सोसायटी मध्ये मित्रांसोबत दारू पार्टीनंतर बाल्कनीतून शिडीवर चढतांना तोल जाऊन तेराव्या मजल्या वरुन खाली पडल्याने बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री मध्य रात्री च्या सुमारास घडली.

अनुपम पाटील (22वर्षे ,रा.एलाइट एम्पायर सोसायटी, बालेवाडी ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अनुपम पाटील हा सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेतो. तो बालेवाडी येथील 43 प्रायव्हेट सोसायटी मध्ये तेराव्या मजल्यावरील फिल्टरमध्ये रविवारी रात्री आपल्या मित्रांसह दारू पीत बसला होता. दारू पील्यानंतर नशेत तो बाल्कनीतील शिडीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो सोळाव्या मजल्यावरून खाली पडला.या दुर्घटनेत अनुपम गंभीर जखमी झाला. यानंतर चतु:श्रूंगी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन अनुपमला ससून रूग्णालयात हलवले .मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.