३९ भारतीयांची हत्त्या हे ‘रानटीपणा व क्रौर्य’ – संयुक्त राष्ट्रसंघ

संयुक्त राष्ट्रे :

इराकमध्ये आयएसआयएस दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त कळल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने सहानुभूती व्यक्त करत हे कुख्यात दहशतवादाचा ‘रानटीपणा व क्रौर्याचे’ उदाहरण असल्याचे म्हटले आहे. इराकमधील मोसूल शहरात २०१४ मध्ये अपहरण करण्यात आलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.

“इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून आपल्याला अत्यंत दुःख झाले. हा प्रसंग रानटीपणा व क्रौर्याचे पुन्हा एक उदाहरण आहे,” असे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांचे विशेष इराक प्रतिनिधी जान कुबीस यांनी म्हटले आहे.