९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किर्ती शिलेदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई येथे होणा-या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किर्ती शिलेदार यांची निवड झाली आहे. संमेलनाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत सुरेश साखवळकर, श्रीनिवास भगणे आणि किर्ती शिलेदार यांचे अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे आले होते. त्यातून एकमताने किर्ती शिलेदारांची निवड करण्यात आली. १३ ते १५ जून दरम्यान मुंबई येथे हे नाट्य संमेलन होणार आहे.