आता महामार्गावर होणार आणखी ‘लुट’, जादा माल वाहतूक केल्यास ‘तुरुंगवारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सर्वच महामार्गावरील चेक नाके, आर टी ओ यांच्याकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि मालवाहतूक करणारे टेम्पो, ट्रक यांची तपासणी केली जाते. तुमची चुकी असो अथवा नसो महामार्गावरील या लुटारुंना चुपचाप ‘खंडणी’ द्यावीच लागते. नाही तर ते कोणतेही कारण काढून तुम्हाला काही तास लटकवून ठेवतात किंवा तुमच्यावर खटला दाखल करतात. आता हा जाच आणखी वाढणार असून महामार्गावरील ही ‘लुट’ वाढणार आहे. याला कारण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सार्वजनिक मालमत्ता (रस्ते) नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ च्या कलम ३ मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली आहे.

सरकारचा कायद्यात दुरुस्ती करण्याचा हेतू चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा याच कायद्याचा गैरवापर करुन महामार्गावर कायद्याचा धाक दाखवून वाटमारी करत असतात.
या अधिसूचनेनुसार क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना यापुढे किमान सहा महिने तुरुंगाची वारी करावी लागणार आहे. शिवाय चालक परवाना तीन वर्षांसाठी रद्द होणार आहे. ट्रकमालकाविरुद्ध गुन्हा दाखल होईल तसेच ट्रक मालक, पुरवठादार व माल घेणारा यांनाही जबर दंड द्यावा लागणार आहे.

रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी, अपघात टळावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे कायदे करण्याबरोबरच जनप्रबोधनावरही भर देत आहेत. तरीही बेकायदा प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. २०१७ मध्ये याला आवर घालण्यासाठी सरकारने कायद्यात दुरुस्ती करून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना केल्या जाणाऱ्या दंडात जबर वाढ केली होती. त्यात आता या दुरुस्तीचीही भर पडली आहे.

असा आहे दंड –

प्रत्येक टनास २० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. प्रवासी वाहतुकीसाठी हाच दंड जादा असलेल्या प्रत्येक प्रवाशामागे एक हजार रुपये इतका आहे. तर दुचाकी वाहनधारकांसाठी दोन हजार रुपये दंड आणि चालक परवाना ३ महिन्यांसाठी रद्द केला जाऊ शकतो. मालवाहतुकीची क्षमता वाहनाच्या वजनासह सोळा टन २०० किलो इतकी होती. गेल्यावर्षी त्यात केंद्र सरकारने २० व महाराष्ट्र सरकारने ५ टक्के अशी २५ टक्के वाढ करून १८ टन ५०० किलो क्षमतेपर्यंत परवानगी दिली आहे. यामध्ये वाहनाच्या वजनाचाही समावेश आहे. तरीही अनेक वाहने क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने ही अधिसूचना काढली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक त्रास –

अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना तपासणीच्या नावाखाली सर्वाधिक त्रास दिला जात असल्याचे परराज्यातील ट्रकचालकांचा अनुभव आहे. अन्य राज्यात बाहेरील राज्यातील वाहन पाहिल्यावर रस्त्यावरील पोलीस त्यांना आवश्यक ती मदत तत्परतेने देतात. रस्ते सांगतात. या उलट महाराष्ट्रात परराज्यातील वाहन दिसल्याबरोबर त्याला अडविले जाते. काहीही कारण सांगून थांबवून त्याची अडवणूक करुन वसुली केली जात असल्याचे अनुभव येत असल्याच्या तक्रारी ट्रकचालकांनी वाहतूक संघटनांकडे तक्रारी केल्या आहेत.

या पाच गोष्टींचा ‘आहारा’ त करा वापर, शरीर होईल निरोगी

पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी आता ‘रेल्वे आरोग्य कार्ड’

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार