फेसबुकवर महिलांना अश्लील फोटो पाठवून ‘सेक्स’ची मागणी करणार्‍या ‘त्या’ युवकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावरील अकाऊंटचा वापर करून महिलांना अश्लील फोटो, मेसेज पाठवून त्यांच्याकडे शारिरीक संबंधाची मागणी करणाऱ्या विकृत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. निखील उर्फ विक्की चंद्रकांत जाधव (वय-२४ रा. तांबजाई नगर, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आरोपी निखील याने URL या सोशल मीडीयावरील मानसी निंबाळकर या बनावट नावाच्या अकाऊंटचा वापर करून तक्रारदार तरुणी आणि इतर महिलांना फेसबुकवर अश्लील फोटो, मेसेज पाठवले. तसेच अश्लिल व्हिडीओ कॉल करून सेक्सची मागणी करत होता. तक्रारदार महिलेला १३ मार्च २०१९ रोजी अश्लील मेसेज पाठवून त्यांच्याकडे सेक्सची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला. सायबर सेलच्या पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना निखिल जाधव हा महिलांना अश्लिल फोटो पाठवत असल्याचे तपास समोर आले. पोलिसांनी आरोपीचा सातारा येथे शोध घेऊन त्याला या गुन्ह्यात अटक केली. आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, महावीर दावणे, आशिष चव्हाण, नागेश पिसाळ, राकेश क्षिरसागर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, प्रमोद नेवसे, रवी लोखंडे, इम्रान नदाफ, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत होळकर यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like