Mumbai : विक्रीसाठी आणलेले 1 कोटी 40 लाखांचे MD जप्त, चौघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत विक्रीसाठी आणलेले तब्बल 1 कोटी 40 लाख किमतीचे 700 ग्रॅम अंमली पदार्थ (एमडी) जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले.या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक केली आहे. गुरुवारी (दि. 10) सांयकाळी ही कारवाई करण्यात आली.

फ्लुगांस उर्फ रोलास उर्फ मुस्तफा लाउड अका (31 ) जरमन जेरी अबाह (29 ) या दोन परदेशी नागरिकांसह दिनानाथ उर्फ तुंटन रंगनाथ चौहान (33), सन्नी संजय साहू (34) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपीपैकी एक जण रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वडाळा पोलीस ठाणे येथे दोन, तर माटुंगा ठाणे येथे एक असे शारीरिक दुखापत, खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचा गुह्यांची नोंद आहे.
कांदिवली पश्चिमेकडील खजुरिया नगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 11 ला मिळाली होती.

त्यानुसार कक्ष 11 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्याच दरम्यान दोन जण रिक्षामधून आले. काही वेळाने दुचाकीवरून दोन परदेशी नागरिक तेथे पोहचले. ते परदेशी नागरिक रिक्षामध्ये असलेल्या व्यक्तींना पॅकेट देत असताना आढळून येताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 700 ग्रॅम एमडी आढळून आले. त्याची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये इतके आहे.