मध्य रेल्वेची कारवाई ! नियमबाह्य प्रवाशांकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दंड वसूल

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन –  रेल्वे ( Railway) गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांनी प्रवास करू नये म्हणून मुंबई रेल्वेच्या ( Mumbai Railway) मुंबई विभागामार्फत एक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या उपनगरीय आणि विशेष लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाविरुद्ध नियमित, गहन आणि विशेष तिकीट तपासणी पथकाकडून जून ते २० नोव्हेंबर यादरम्यान तपासणी करण्यात आली. यामध्ये दंड ( Fine) म्हणून १ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम रेल्वेकडून वसूल करण्यात आली. उपनगरी गाड्यांमध्ये सर्वाधिक ३९ हजार ५१६ प्रकरणे आढळून आली. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लांब पल्ल्याच्या म्हणजेच मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणांमध्ये एकूण ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला गेला.

कोणत्या विभागात किती प्रकरणे सापडली

१) नियमित तिकीट तपासणी मोहिमेमध्ये ३६ हजार ७५४ प्रकरणे आढळून आली.

२) गहन तिकीट तपासणी मोहिमेमध्ये ४ हजार ६१६ प्रकरणे आढळून आली.

३) विशेष तिकीट तपासणीच्या मोहिमेमध्ये २ हजार १४६ प्रकरणे आढळून आली.
गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आले आहे.

You might also like