पुणे रेल्वे स्थानकावर १ कोटी रुपयाचे सोने जप्त (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे रेल्वे स्थानकावर १ कोटी ५ लाख रुपये किंमतीचे २ किलो ९०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई नुकतीच पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या घातपात विरोधी पथकाने केली. उदयलाल गोवर्धन गुजर (वय-३५), सागर जमनालाल जट्ट (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चेन्नई मेलमधून दोन संशयीत कोट्यावधीचे सोने घेऊन येत असल्याची माहिती पुणे रेल्वे पोलिसांना मिळाली होती. रेल्वे पोलिसांच्या घातपात विरोधी पथकाने सापळा रचून गुजर आणि जट्ट यांना ताब्यात घेऊन त्यांच्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे सोने आढळून आले. या सोन्याविषयी चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सोने जप्त करून दोघांना अटक केली आहे.

सोने जप्त केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी आयकर विभागाला दिली आहे. आयक विभागाकडून तपास सुरु असून दोघांना आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पुणे पोलीस निरीक्षक गौड यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या सोन तस्करी मुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –