कात्रजमध्ये १ लाख १७ हजार रुपयांची घरफोडी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – घराच्या स्लायडींग खिडकीवाटे आत प्रवेश करत कपाटातील १ लाख १७ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील शिवकृपा अपार्टमेंटमध्ये उघडकिस आला आहे.

याप्रकरणी सुहास बाळासो जाधव (४०, मांगडेवाडी कात्रज) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुहास जाधव हे मांगडेवाडी येथील शिवकृपा अपार्टमेंटमध्ये ३०७ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहण्यास आहेत. ते मगरपट्टा येथे एका कंपनीतील वाहनावर चालक म्हणून काम करतात. २५ डिसेंबर रोजी ते कंपनीची ट्रीप घेऊन बाहेरगावी गेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञाताने घराच्या उघड्या दारावाटे किंवा स्लायडींग खिडकीवाटे आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले १ लाख १७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ट्रीपवरून आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बढे करत आहेत.

पोलीस शिपाई भरतीत मोठे बदल