IT क्षेत्रात 1 लाख रोजगाराच्या संधी, मोठ्या प्रमाणात होणार नोकर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, आगामी काळात भारतातील आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्याच्या तयारी आहेत. देशातील टॉपच्या कंपन्या देशभरात जवळपास एक लाख नोकर भरती करणार आहे. क्लाइंट कंपन्यांकडून बरेच काम डिजिटल माध्यमातून करणं सुरु आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. क्लाइंट कंपन्यांनी त्यांचे काम आऊटसोर्सिंग करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांना नवीन नोकर भरती करणार आहेत.

पहिल्या तिमाहीमध्ये भरती रोखण्यात आल्याने आता या कंपन्यांनी वेगाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएस यावर्षी 40 हजार नवीन भरती करु शकते. कंपनीने नवीन आणि पार्श्विक भरती सुरु केली आहे. इन्फोसिस 20 हजार आणि एचसीएल 15 हजार भरती करणार आहे. कॉग्निझंट देखील 15 हजार भरतीची तयारी करत आहे. कोरोनामुळे कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी जॉईनर्सना लेटर देणे बंद केले होते.

मात्र, आता पुन्हा भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जेनसर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात त्यांनी पाच लोकेशन फ्रेशर्स भरती केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपन्यांनी भरती केली नसल्याने बऱ्याच जागा भरायच्या राहिल्या आहेत. गेल्या महिन्यात महसूलात घट झाली होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. महसूलात वाढ होत असल्याने कंपन्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आयटी कंपन्यांच्या म्हणण्यानुसार मध्यम व वरिष्ठ पातळीवरही मोठ्या भरती होत आहेत.