Be Careful : काय सांगता ! होय, भारतात ‘या’ राज्यात मास्क परिधान न केल्यास 1 लाख रूपये दंड, 2 वर्षाची जेल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देश अनलॉक करण्याच्या दिशेने वाटचाल करत असला तरी अनेक राज्य सरकारांनी यासाठी कडक नियम ठेवले आहेत. झारखंडमध्ये कोरोनाच्या नियमांचे अवहेलना केल्यास आणि मास्क न घातल्यास 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. झारखंड मंत्रिमंडळाने या संदर्भात संसर्गजन्य रोग अध्यादेश – 2020 मंजूर केले. वास्तविक झारखंडमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारी रूग्णालयात जागादेखील नाही. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने निर्णय घेतला की, आता खासगी रुग्णालये आणि बँक्वेट हॉलचा उपयोग आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी केला जाईल. झारखंड विधानसभेतील काही कर्मचारी आणि आमदारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर विधानसभा सचिवालयात 23 ते 27 जुलै पर्यंत (5 दिवस) सील करण्यात आले आहे.